

प्रेरणा फाउंडेशन महाराष्ट्र सामाजिक संस्थेचा ८ वा वर्धापन दिन सत्कर्म आश्रमात भारत गौरव पुरस्कार वितरण सोहळा धुमधडाक्यात साजरा.
प्रेरणा फाउंडेशन रजि. 564/एफ38784/बदलापूर/ठाणे/महाराष्ट्र या सामाजिक संस्थेचा 22 मार्च 2026 रविवार रोजी प्रेरणा फाउंडेशनचा ८ वा वर्धापन दिन सोहळा दुपारी 2 ते संध्याकाळी 6 वाजता सत्कर्म बालकाश्रम ,बदलापूर येथे भारत गौरव पुरस्कार 2026 पुरस्कार वितरण करून धुमधडाक्यात साजरा झाला.
या पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन प्रेरणा फाउंडेशन च्या संस्थापिका/अध्यक्षा सौ.प्रेरणा वैभव कुलकर्णी यांनी केले ,यांना मा. श्री संजीव जैन( ईंटेग्रेवोन कंपनी चीफ इन्फॉर्मेशन ऑफिसर), मा.श्री.अविनाश म्हात्रे सर (कुष्ठरोग दीनदयाळ संस्था अध्यक्ष), मा.सौ रजनी लुंगसे मॅडम ( प्रसिद्ध समाजसेविका), मा.श्री.धनजी पवार(प्रसिद्ध समाजसेवक) मा.सौ.अश्विनी कसबे (प्रसिद्ध समाजसेविका), मा.श्री.मोहन शुक्ला ( प्रसिद्ध समाजसेवक), मा मोहन कदम (प्रसिद्ध समाजसेवक,पत्रकार), मा.सौ. माधुरी भोईरकर ( प्रसिद्ध समाजसेविका), मा. लोकशाहीर भीमराव ठोगिरे (प्रसिद्ध लोकशाहीर,समाजसेवक), मा. श्री.रघुनाथ फडके (प्रसिद्ध गायक, आकशवाणी केंद्राचे माजी संचालक), मा. श्री.राजेश भांगे ( प्रसिद्ध उद्योगपती) यांचे बहुमोलाचे सहकार्य लाभले.
प्रेरणा मॅडम व या उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.
या कार्यक्रमात मा श्री. अविनाश म्हात्रे सर यांचे यांचा जुनी नाणी संग्रह हा पुस्तकं प्रकाशन सोहळा ही पार पडला. तसेच 26एप्रिल हा प्रेरणा नाट्यमंडळ माध्यमातून प्रेरण वैभव कुलकर्णी याच्यास्वलीखित स्वदिग्दर्शीत नाटकाचा कार्यक्रमासाठी तिकीट विक्री करून 90%अपंग मुलगी मोहिनी बुमावर हिच्या उपचारासाठी करणार आहेत तर तिकीट विक्रीचे आव्हाहनही करण्यात आले.
प्रेरणा फाउंडेशन हे एक सामाजिक संस्था असून प्रत्येक क्षेत्रात कार्यरत आहे. प्रेरणा फाऊंडेशन गेले सहा वर्ष सतत गोर गरीब लोकांना, रस्त्यावरील भटकी लोकांना, अनाथांना आधार देण्याचे काम करते. अनेक आदिवासी पाडे सुधारणे, आदिवासी गावाला रस्ता, वीज, पाणी व लाईट याची सोय, नदया,चौपाटी,एस टी डेपो, रेल्वे स्टेशन,रस्ते,ठिकठिकाणी स्वछता अभियान राबविणे, अनेक अनाथालय, वृद्धाश्रम, अनाथ रस्त्यावरील भटकी मुले यांना सहारा व सहकार्य देण्याचे काम करते. व तसेच प्रेरणा रंगमंच नाट्यमंडळ व प्रेरणा इन्स्टिटयूट अंतर्गत येणारे उपन्न सौ.प्रेरणा वैभव कुलकर्णी ह्या प्कॅन्सरग्रस्त, किडनीग्रस्त ई. मतिमंद निराधार लोकांना आधार देण्यासाठी वापरतात.
सत्कर्म आश्रम चे अध्यक्ष नामदेव पेशने व आश्रम कमिटी यांची उपस्थिती होती . या कार्यक्रमाला फाउंडेशन चे सचिव वैभव कुलकर्णी,खजिनदार कु. रोहन गावकर, मा.शैलेश सणस, श्री.हर्षल शिंदे.सौ. उर्मिला चौधरी, श्री.मंगेश सावंत यांचे विशेष सहकार्य लाभले.
प्रेरणा फाउंडेशन च्या संस्थापिका मा. प्रेरणा कुलकर्णी यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले व लोकशाहीर भीमराव सर यांच्या पोवाड्याने व अल्पोहारने कार्यक्रमाची सांगता झाली.



